Asia Cup 2023 Super4 India vs Bangladesh : आज आशिया चषक 2023 चा शेवटचा सुपर फोर सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे.17 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्धच्या फायनलपूर्वी तयारी म्हणून टीम इंडिया हा सामना पाहणार आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात नाणेफेक(TOSS) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकात 8 बाद 265 धावा केल्या असून भारतीय संघासमोर विजयासाठी 266 धावाचं लक्ष्य ठेवलं आहे.
बांगलादेशकङून फलंदाजीत कर्णधार शकीब अल हसनने सर्वाधिक 80 धावांचे योगदान दिले. तौहीद हृदयॉयने 54 आणि नसूम अहमदने 44 धावा केल्या.
भारताकडून शार्दुल ठाकूरने तीन आणि मोहम्मद शमीने दोन बळी घेतले. प्रसिध, अक्षर आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. या सामन्यात जडेजाने एकदिवसीय क्रिकेटमधील 200 बळीही पूर्ण केले.
दरम्यान,कर्णधार रोहितने आज प्लेइंग-11 मध्ये पाच बदल केले आहेत. विश्वचषक आणि खेळाडूंवर कामाचा ताण आणि दुखापतीची भीती लक्षात घेऊन रोहितने हा निर्णय घेतला. फायनलपूर्वी हिटमॅनला आपल्या खेळाडूंना ताजेतवाने ठेवायचे आहेत. आशिया चषकाचा अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव हा सामना खेळत नाहीत. त्यांच्या जागी तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांचा प्लेईंग-11 मध्ये समावेश केला आहे.तर बांगलादेशकडून तनझिम हसन हा वनडे संघात पदार्पण करत आहे.
दोन्ही संघाचे Playing 11 पुढीलप्रमाणे :-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, प्रसीध कृष्णा, मोहम्मद शमी.
बांगलादेश : तनजीद हसन तमीम, लिटन दास (यष्टीरक्षक), अनामूल हक, शकीब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, नसुम अहमद, तन्झिद हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान.