आशुतोष गोवारीकरचा “पानीपत’ येत्या 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे. संजय दत्त, अर्जुन कपूर आणि कृति सेनन या सिनेमातील लीड रोलमध्ये आहेत. तर पद्मिनी कोल्हापुरे, मोहनीश बहल आणि झीनत अमान हे विशेष रोलमध्ये दिसणार आहेत. याशिवाय काही मराठी कलाकारही या सिनेमामध्ये दिसणार आहेत, असे समजते आहे. मराठे आणि अहमदशाह अब्दालीमध्ये 17 जानेवारी 1761 रोजी झालेल्या ऐतिहासिक पानिपतच्या युद्धावर या सिनेमाची कथा बेतलेली आहे.
आशुतोष गोवारीकरची पत्नी सुनिता गोवारीकरची कंपनी “एजीजीपीपीएल’ आणि रोहित् शेलटकरची कंपनी “व्हिजन वर्ल्ड’ने मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. पानीपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा दारुण पराभव झाला होता. मात्र या सिनेमामध्ये मराठ्यांची शौर्यगाथा दाखवण्यात येणार आहे.
केवळ युद्ध दाखवणे हा या सिनेमाचा उद्देश नाही, तर त्या युद्धातील मराठ्यांच्या पराभवाची कारणे दर्शवणे हा देखील यचा उद्देश आहे. आशुतोष गोवारीकरने यापूर्वी “जोधा अकबर’ आणि “मोहोंजदडो’ सारख्या ऐतिहासिक विषयांवरही सिनेमे केले आहेत. त्यामुळे त्या अनुभवाचा फायदा यावेळीही त्याला मिळाला आहे.