मुंबई – सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होतात. अशा स्थितीत कोणाचे नशीब कधी उजळेल हे कोणालाच सांगत येत नाही.परंतु सोशल मीडियामुळे अनेकांच्या टॅलेंटला वाव मिळाला एवढं मात्र नक्की. असाच काहीसा प्रकार बिहारमधील समस्तीपूर जिल्हा पटोरी येथील रहिवासी अमरजित जयकरसोबत घडला आहे.अभिनेता सोनू सुदने अमरजित जयकरचे चांगलेच कौतुक केले आहे.
अभिनेता सोनू सूद सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. कधी सोनू अचानक एखाद्या टपरीवर जाऊन व्हिडीओ करतो तर कधी सोशल मीडियावरील एखादी पोस्ट शेअर करून सगळ्याच लक्ष वेधून घेतो.गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अमरजित जयकर यांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत ज्यामध्ये तो विविध गाणी म्हणताना दिसत आहे. अमरजित जयकरचा असाच एक व्हिडीओ सोनुने शेअर केला आहे.
एक बिहारी , सौ पे भारी। https://t.co/ZsHwTwTHZL
— sonu sood (@SonuSood) February 21, 2023
‘दिल दे दिया है’ हे गाणं अमरजित जयकरने गायलेला व्हिडीओ सोनुने शेअर केला. याला सोनुने ‘एक बिहारी, सौ पे भारी’ असे कॅप्शन दिले आहे. यानंतर एक व्हिडिओ जारी करून अमरजीतने सोनू सूदचे आभार मानले आहेत तसेच सोनू सूदने आपल्याला मुंबईला बोलावल्याचे देखील या गायकाने यावेळी सांगितले. सोनू सूदने अमरजीतला त्याच्या फतेह चित्रपटात गाण्याची ऑफर दिली असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.