मुंबई – अभिनेत्री ‘अपूर्वा नेमळेकर’च्या रात्रीस खेळ चाले या मालिकेतील भुमिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तिची शेवंता नावाची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. छोट्या मुलांपासून प्रौढांपर्यंत सगळेच तिच्या रूपाचे दिवाने झाले होते. मात्र, ती मालिका संपली त्यानंतर अपूर्वा बिग बॉस मराठीच्या घरात दिसून आली होती. बिग बॉस मराठी सीजन 4 मध्ये अपूर्वाचा एकदम हटके अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला. मग ती टास्कविषयी चर्चा असो, घरात होणार्या राड्यांविषयी असो या सगळ्यात अपूर्वाचा मोठा सहभाग दिसून आला.
दरम्यान, आता ‘बिग बॉस मराठी 4’ मध्ये धुमाकूळ घालून प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी अपूर्वा नेमळेकर. लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत फॅन्सला ही आनंदाची बातमी दिली आहे. ही कोणतीही नवी मालिका किंवा चित्रपट नाहीये. तर पहिल्यांदाच अपूर्वा एका शॉर्टफिल्ममधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
ती ‘द डिलिव्हरी बॉय’ या शॉर्टफिल्ममधून आपल्या अभिनयाची नव्याने सुरुवात करत आहे. या शॉर्टफिल्मचं चित्रीकरण तिने बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच केलं होतं. आता लवकरच ही शॉर्टफिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या फिल्ममधील अपूर्वाला पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर जोरदार सक्रिय असणारी अपूर्वा नेहमीच आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांना घायाळ करत आली आहे.