लष्करी अधिकाऱ्यांच्या नावाने तब्बल 3 हजार शस्त्र परवाने; जम्मू काश्‍मीरात सीबीआयचे छापा सत्र

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरात अनिवासी लोकांना मोठ्या प्रमाणात खोट्या कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाने देण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी आता सीबीआय करीत असून त्यांनी या अनुषंगाने अनेक ठिकाणी छापे घातले आहेत.

या व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. सन 2019 मध्ये दाखल झालेल्या एका केसच्या अनुषंगाने ही कारवाई झाली आहे. सन 2012 ते 2016 या अवधीत जम्मू काश्‍मीरच्या विविध महसुल विभागाच्या उपआयुक्तांनी पैसे घेऊन मोठ्या प्रमाणावर शस्त्र परवाने जारी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या घोटाळ्याची कुणकुण राजस्थान एटीएसने सन 2017 मध्ये केलेल्या कारवाईतून लक्षात आली आहे. त्यावेळी राजस्थान एटीएसने असे शस्त्र परवाने मिळवलेल्या किंवा त्यासाठी मदत करणाऱ्या किमान 50 जणांना त्यावेळी अटक केली आहे. राजस्थान एटीएसने दिलेल्या माहितीनुसार लष्करी अधिकाऱ्यांच्या नावानी जम्मू काश्‍मीरातून तब्बल तीन हजार शस्त्र परवाने जारी करण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.