मुंबई – क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर सात आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आर्थर रोड जेलमध्ये आर्यनला ठेवण्यात आलं आहे.
आर्यनला जामीन मिळावा यासाठी वकिलांकडून पुरेपूर प्रयत्न सुरु असून, त्यांना देखील अपयश मिळत आहे. दरम्यान आर्थर रोडमध्ये क्वारंटाइन बराकमध्ये असलेल्या आर्यन खानसमोर आता नवं आव्हान आहे.
कारण त्याचा क्वारंटाइनचा कालावधी संपला असल्याने आर्यन खानला कारागृहातील इतर कैद्यांसोबत राहावं लागणार आहे. आर्यनचा करोना अहवाल निगेटिव्ह आला असायची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे आता त्याला क्वारंटाइन बराकमधून इतर कैद्यांसोबत ठेवण्यात आलं आहे.
आर्यन खानवर एनसीबीने आरोप केला आहे की, “तो परदेशातील काही लोकांच्या संपर्कात होता जे बेकायदेशीर खरेदीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कचा भाग असल्याचे दिसते आणि तपास चालू आहे. जामीन मिळाल्यास तो देश सोडून जाऊ शकतो या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही, असे एनसीबीने म्हटले आहे.