पुणे :- ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अण्णासाहेब पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त खराडी जिमखाना व आर्या स्पोर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्या स्पोर्टस टी-२० क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत रॉयल पुरंदर, सारस हॉटेल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
खराडी जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत धीरज फटांगरे (१०७ धावा) याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर सारस हॉटेल संघाने ऍडलर संघाचा ५३ धावांनी पराभव केला.
दुसऱ्या सामन्यात महेश मस्के (७२ धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल पुरंदर संघाने एक्का लायन्स संघाचा ६५ धावांनी पराभव केला. याचबरोबर अ गटातून अजिंक्य क्रिकेट क्लब, स्टार इलेव्हन, क गटातून पुणेरी क्रिकेट क्लब, ब गटातून किंग्ज स्पोर्ट्स, २२ यार्डस या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.