बलिया – आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाषा बोलू लागले आहेत. म्हणूनच त्यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणेशाच्या प्रतिमा लावण्याची सूचना केली आहे असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केला आहे.
काल येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांना ना भारतीय संविधानाचे ज्ञान आहे, ना त्यांना धर्मनिरपेक्ष भारतीय राज्यघटनेचा आदर कसा करायचा हे माहीत आहे. केजरीवाल याचे भाजपशी आणि संघाशी संगनमत आहे हे यातून स्पष्ट दिसते आहे असे ते म्हणाले.
केजरीवाल तेच बोलत आहेत जे त्यांना आरएसएस बोलायला लावत आहे. केजरीवाल मतांच्या लालसेपोटी काहीही बोलू शकतात असे ते म्हणाले. मौर्य म्हणाले की, देशात 34 कोटी देवता आहेत आणि सरकारने चलनी नोटांवर त्यापैकी केवळ दोनच देवतांची चित्रे लावली तरी इतर देवतांचे काय होईल.