Arvind Kejriwal ED। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज पुन्हा एकदा ईडीसमोर गैरहजर राहिले. दिल्लीतील अबकारी कर घोटाळ्यात मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱ्या ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र दरवेळी प्रमाणे यावेळी देखील केजरीवाल गैरहजर राहिले आहेत.
ईडीच्या समन्सच्या वैधतेचा मुद्दा न्यायालयात Arvind Kejriwal ED।
मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. ‘आप’ने ईडीचे समन्स बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय. त्यामुळं आता ईडीच्या समन्सच्या वैधतेचा मुद्दा न्यायालयात आहे, असे आपने म्हटले आहे. ईडीने न्यायालयात धाव घेतलीय. पुन्हा पुन्हा समन्स पाठवण्याऐवजी ईडीने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी. केजरीवाल ईडीच्या समन्सवर हजर न होण्याची ही सहावी वेळ आहे.
हेही वाचा
मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात हजेरी ; म्हणाले,”विश्वास प्रस्तावा….”
दिल्लीच्या अबकारी धोरणात घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी सीबीआय तपास करत आहे. त्याच वेळी, ईडी या प्रकरणाचा मनी लॉन्ड्रिंगच्या कोनातून तपास करत आहे. केंद्रीय एजन्सींनी या प्रकरणी आतापर्यंत आपचे दोन मोठे नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक केली आहे. केजरीवाल यांना कॉल करण्यासाठी ईडीने 6 समन्स पाठवले आहेत.
दिल्लीच्या अबकारी धोरणात घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. याप्रकरणी सीबीआय तपास करत आहे. त्याच वेळी, ईडी या प्रकरणाचा मनी लॉन्ड्रिंगच्या दृष्टितिकोनातून तपास करत आहे. केंद्रीय एजन्सींनी या प्रकरणी आतापर्यंत आपचे दोन मोठे नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक केली आहे. केजरीवाल यांना ईडीने आतापर्यंत 6 वेळा समन्स पाठवले आहेत.
दरम्यान, या पूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे कोर्टात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी विधासभेतील कामकाजामुळे आपण प्रत्यक्ष हजर राहू शकत नसल्याचे कारण दिले होते. तसेच पुढच्या वेळी प्रत्यक्ष कोर्टात हजर राहू असे आश्वासन दिले होते.