नवी दिल्ली – कोविड 19 च्या साथीशी लढा देण्यासाठी लोकांनी एकत्र यावे, या उद्देशाने सरकारनं सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून आरोग्य सेतू ऍप सुरू केल्याचा खुलासा इलेक्ट्रॉ निक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केला आहे. आरोग्य सेतू ऍपबाबत माहिती अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय माहिती आयोगाने सरकारकडे खुलासा मागितला होता. त्याला उत्तर देताना इलेक्ट्रॉ निक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
या ऍपच्या निर्मितीत सहभागी असणाऱ्याची नावे हे ऍप सर्वांसाठी खुले करतानाच जाहीर करण्यात आली होती, अत्यंत पारदर्शक पद्धतीने याचे काम झाले असून, आरोग्य सेतू पोर्टलवर सर्व माहिती देण्यात आल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.