मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे चांगलीच चर्चेत आहे. अंशुला तिचा चर्चित बॉयफ्रेंड रोहन ठक्करसोबत मालदीवमध्ये क्वालिटी टाइम घालवत आहे. अंशुलाने मालदीवमधील रोहनसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताहेत आणि चाहते त्यावर अंशुलाला अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत.
अंशुला कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अंशुलाने चाहत्यांना तिच्या मालदीव व्हेकेशनची झलक दाखवली आहे. फोटोमध्ये अंशुला समुद्राच्या कडेला झोक्यावर बसून पोज देताना दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोत ती रोहन ठक्करवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. फोटोमध्ये दोघेही प्रचंड खुश असल्याचे पाहायला मिळत आहे.
अंशुला कपूरने शेअर केलेल्या आणखी एका फोटोमध्ये ती पूलमध्ये बिकिनीमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये ती पाऊट करताना देखील दिसते. यासोबतच अंशुलाने काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे. त्याचवेळी, तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा वन-पीस परिधान केला आहे. या वन पीसमध्ये अंशुला खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
View this post on Instagram
हे सर्व फोटो पाहून चाहते खूपच उत्सुक दिसत आहेत. अनेकांनी तिला तू चित्रपटात कधी दिसणार ? असा सवाल विचारला आहे. चाहत्यांना अंशुलाचे हे फोटो आणि तिचा ग्लॅमरस अंदाज चांगलाच आवडला आहे.