संगमनेर – युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून अमृतवाहिनीत होत असलेल्या मेधा सांस्कृतिक महोत्सवात शुक्रवारी (दि.17) सायंकाळी 6.30 वाजता सैराट फेम आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू व हास्यकलावंत भाऊ कदम, कुशल बद्रिके, चिन्मय उदगीरकर, गायिका कार्तिकी गायकवाड, गणेश पंडित, जुईली जोगळेकर, सायली पराडकर सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख यांनी दिली.
अमृतवाहिनीतील क्रीडा संकुलातील मेधा मैदानावर हा महोत्सव होत आहे. महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 16) सकाळी 11 वाजता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, एबीबी कंपनीचे अध्यक्ष गणेश कोठावदे, विश्वस्त शरयूताई देशमुख, राजवर्धन थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. शुक्रवारी सायं 6.30 वाजता मेधा मैदानावर सैराट फेम आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरु व हास्यकलावंत भाऊ कदम आणि कुशल बद्रिके, चिन्मय उदगीरकर, गायिका कार्तिकी गायकवाड, गणेश पंडित, जुईली जोगळेकर, सायली पराडकर, आकाश हांडे सहभागी होणार आहेत.