मुंबई – बिग बॉसच्या बहुचर्चित १६ व्या सिजनला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत बिग बॉसच्या घरात अनेक बहुचर्चित सदस्यांनी हजेरी लावलेली आहे. परंतु यंदाच्या या सिजनमध्ये बिकिनी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका महिला राजकारणी व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अर्चना गौतम असे असे या बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मी लग्न केलं तर एखाद्या नेत्याशीच (आमदार,खासदार) करणार असे विधान करून अर्चना बिग बॉसच्या घरामध्ये चांगलीच चर्चेत आली आहे. टीव्ही जगतातील बिग बॉस हा सर्वाधिक टीआरपी असलेला शो आहे. अर्चना या शोमध्ये आल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल व्हायला सुरुवात झाली होती.
मुळची उत्तरप्रदेशातील रहिवासी असलेल्या अर्चना गौतम हिने काही वर्षांपूर्वी मॉडेलिंगमधून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने मिस यूपीचे विजेतेपदही पटकावले होते.ग्रेट ग्रँड मस्ती हिंदी चित्रपटातून अर्चनाने आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर ती हसीन पारकर, बरोटा कंपनी यासारख्या चित्रपटातही झळकली होती. २०२१ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश करून अर्चनाने युपीमधून विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती ज्यात तिचा भाजप उमेदवाराने पराभव केला होता.