कोपरगाव – ईद सणाचे औचित्य साधत आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील अक्सा मस्जिदच्या 25 लाख रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या सभामंडप व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करून मुस्लिम बांधवांना अनोखी भेट दिली. यावेळी आ. काळे यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
आ. काळे म्हणाले की, “उन्हाचा पारा चढलेला असतांना अंगाची होणारी लाहीलाही, घशाला पडणारी कोरड अशा परिस्थितीत पवित्र रमजान महिन्यात रमजानचे रोजे पाळणं हे मोठ दिव्य दरवर्षी मुस्लिम बांधव पार पाडून अल्लाहचे आशीर्वाद घेतात.” कोपरगाव शहरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदान व अक्सा मस्जिद येथे सामुदायिक नमाज पठण केले.
अक्सा मस्जिद, कोपरगाव येथे २५ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या सभामंडप बांधकाम व मस्जिद सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न.#AshutoshKale #Kopargaon pic.twitter.com/5jQdUvMHxZ
— Ashutosh Kale (@AshutoshAKale) April 22, 2023
यावेळी आ.काळे यांनी उपस्थित राहून सर्व मुस्लीम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मौलाना हमीदभाई राही, मौलाना आदीबभाई खान, माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, फकीर कुरेशी, अजीज शेख, इम्तियाज अत्तार, जावेद शेख, चांदभाई पठाण, शफीक शेख, नदीम मन्सूरी, कलीमभाई, शकील खाटीक, जमिल पठाण, जावेद शेख, मुन्ना सय्यद, शफिक सय्यद, रशीद शेख, छोटू पठाण, फिरोज सय्यद, समर शेख, मुक्तार शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, मनोज नरोडे, राजेंद्र आभाळे, मुकुंद इंगळे, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के उपस्थित होते.