खालापूर, (वार्ताहर) – कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तचे पत्र खोपोलीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.
या वेळी महिला आघाडी रायगड जिल्हा संघटक सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व उपजिल्हा संघटक अनिता पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले. या वेळी शैला भगत, सुविधा विचारे, रंजना राणे, वैजंयता गायकवाड, भारती लोते आदी उपस्थित होत्या.
या वेळी खालापूर तालुका संपर्क युवती अधिकारीपदी रिया मालुसरे, वासरंग – लौजी – चिंचवली शहर संघटिकापदी नंदा धडाम, सावरोली पंचायत समिती संघटकपदी कुसुम मरागजे, तांबाटी ग्रामपंचायत संघटकपदी भाग्यश्री थोरवे, खरसुंडी शाखा संघटकपदी मीनल बारस्कर, उपशाखा संघटकपदी सुरेखा उतेकर, होनाड ग्रामपंचायत संघटकपदी दर्शना खालगावकर, आत्करगाव शाखा संघटकपदी सुषमा बुधेलकर, खोपोली उपशहर संघटकपदी सुचीता शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.