सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते यांची पदोन्नतीवर साताऱ्याचे उपवनसंरक्षक म्हणून नेमणूक झाली आहे. तर डॉ. भारतसिंह हाडा यांची नागपूर येथे झाली आहे. याबाबतचे आदेश आजच मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी काढले आहेत.
भारतीय वनसेवेतील 27 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत. त्यामध्ये या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डॉ. भारतसिंह हाडा यांची नागपूरला बदली झाली असून त्यांच्या पत्नी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक डॉ. विनिता व्यास यांचीही नागपूरला कार्य आयोजना येथे बदली झाली आहे.
सामाजिक वनीकरणचे धरमवीर सालविठ्ठल यांची उपवनसंरक्षक वडसा (प्रादेशिक) येथे बदली करण्यात आली आहे. मोहिते यांनी 2012 ते 16 या कालावधीत सहाय्यक वनसंरक्षक म्हणून साताऱ्यात काम केले. नंतर दोन वर्षे त्यांनी पुण्यात काम पाहिले. त्यांनी 2018 पासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चांदोली राष्ट्रीय उद्यानात विभागीय वनाधिकारी म्हणून आजअखेर काम पाहिले.