नवी दिल्ली – देशात गेल्या चोवीस तासांत कोविडचे 3 लाख 60 हजार 960 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या 1 कोटी 79 लाख 97 हजार 267 वर गेली आहे. गेल्या 24 तासांत करोनामुळे एकूण 3293 रुग्ण दगावल्यामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 2 लाख 1 हजार 187 इतकी झाली आहे.
दरम्यान, करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 कोटी 48 लाख 17 हजार 371 इतकी झाली आहे. तथापि, देशात सक्रिय बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सेवेची मात्र चांगलीच दमछाक होत आहे. गेल्या चोवीस तासांत देशातील सक्रिय बाधितांची संख्या तब्बल 29 लाख 78 हजार 709 इतकी झाली आहे. कोविड रुग्णांचा रिकव्हरी रेट दिवसेंदिवस घसरत आहे तीही एक चिंतेची बाब ठरली आहे. हा रिकव्हरी रेट आता 82.33 टक्क्यांवर आला आहे. देशातील करोना रुग्णांचा आकडा 19 एप्रिल रोजी दीड कोटींचा टप्पा पार करून गेला असून आता तो झपाट्याने दोन कोटींच्या दिशेने झेपावताना दिसतो आहे.