पुणे – जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, काॅंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आणि लोणी काळभोरचे प्रगतशील शेतकरी रामचंद्र उर्फ अप्पासाहेब गणपतराव काळभोर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 95 वर्षांचे होते. आज सकाळी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या मागे पत्नी शकुंतला, राजकुमार आणि बाळासाहेब ही दोन मुले तसेच भारती विजय पोमण, रंजना अनिल लिंबे, आशाताई शंकर खवले या विवाहित मुली तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत खासदार विठ्ठल तुपे पाटील यांचे ते मेव्हणे होत. अप्पासाहेब यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता लोणी काळभोर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.