पुणे – हॉटफुट स्पोर्ट्स यांच्या तर्फे आयोजित सातव्या ‘अपोलो हॉटफुट करंडक’ युवा साखळी फुटबॉल स्पर्धेच्या ९ वर्षाखालील गटामध्ये साई फुटबॉल अकादमी, ब्राका अकादमी पुणे, स्पोर्टीक्यु फुटबॉल अकादमी आणि फाल्कन्स् फुटबॉल अकादमी या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत उद्धघाटनाचा दिवस गाजवला.
बावधन येथील हॉटफुट अकादमीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात विवान शर्मा याने मारलेल्या तीन गोलांच्या जोरावर साई फुटबॉल अकादमीने उत्कर्ष क्रिडा मंच अ संघाचा ३-१ असा पराभव केला. ब्राका अकादमी पुणे संघाने ४ लायन्स् फुटबॉल अकादमी अ संघाचा ७-० असा सहज पराभव केला. सामन्यात कविश नाईक याने ४ गोल, रोहन नागपाल याने २ गोल आणि रायन टिंगरे याने एक गोल केला. स्पोर्टीक्यु फुटबॉल अकादमीने सिग्मय फुटबॉल क्लबचा ५-० असा पराभव केला. फाल्कन्स् फुटबॉल अकादमी संघाने मॅथ्यु फुटबॉल क्लबचा ५-३ असा पराभव केला.
१५ वर्षाखालील गटाच्या सामन्यात इक्बाल शेख याने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर स्पोर्ट्स मेनिआ संघाने लौकिक फुटबॉल अकादमी ब संघाचा १-० असा पराभव केला. मल्हार दरेकर आणि राणा पवार यांच्या गोलपूर्ण कामगिरीच्या जोरावर मॅथ्यु फुटबॉल अकादमीने ब्राका अकादमी पुणे संघाचा ४-० असा पराभव केला.
Lionel Messis : मेस्सीच्या विश्वकरंडक जर्सींवर करोडोंची बोली…
इशा छातुर आणि वीर गुरबक्क्षानी यांच्या कामगिरीच्या जोरावर ४ लायन्स् फुटबॉल अकादमी अ संघाने एसपीजे अकादमीचा ३-० असा सहज पराभव केला. सार्थक झांबरे आणि अल्हाद देशपांडे यांनी केलेल्या गोलामुळे फाल्कन्स् फुटबॉल अकादमीने गोप्रो अकादमीचा २-० असा पराभव करून विजयी सलामी दिली.