१३ मार्च ते २० मार्च २०२२ पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे – (अनिता केळकर (लेखिका-ज्योतिषतज्ज्ञ)
मेष : प्रगतीच्या दृष्टीने योग्य ती वाटचाल होईल. व्यवसायात योग्य वेळी योग्य व्यक्तींची मिळालेली संगत उपयोगी पडेल. निर्णय अचूक ठरतील. मनातील बऱ्याच काळ रेंगाळत असलेली मनिषा पूर्ण होईल. चांगली बातमी कळेल. नोकरीत अपेक्षित पत्रव्यवहार होतील. परदेशगमनाच्या कामांना चालना मिळेल. नवी संधी चालून येईल. घरात वातावरण आनंदी राहील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता साधावी.
वृषभ : स्वयंसिद्ध राहा. व्यवसायात अनपेक्षित मदत मिळाल्याने आश्चर्याचा धक्का बसेल. कामात व्यवहारी दृष्टिकोन राहील. वेळेचे महत्व पटेल. पैशाची तजवीज झाल्याने खेळत्या भांडवलाची सोय होईल. नोकरीत भविष्यात लाभदायी काम कराल. मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्याकडे कल राहील. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. नवीन जबाबदारी पेलावी लागेल. गृहिणींना आवडत्या छंदात वेळ रमवता येईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबाबत मित्रांवर विसंबून राहू नये.
मिथुन : ग्रहांची मर्जी आहेच तेव्हा संधीचा लाभ घ्या. व्यवसायात नवीन योजना तुम्हाला आकर्िर्षत करतील. खर्चाचा ताळेबंद केल्याखेरीज कोणतीही कृती करू नका. अंथरुण पाहून पाय पसरा. नोकरीत कामात बेत गुप्त ठेवा. हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवा. कामामुळे प्रवासयोग. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात शब्द हे शस्त्र आहे लक्षात ठेवावे. मने दुखवू नयेत. कलावंत खेळाडूंना त्यांच्या क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांना कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल.
कर्क : सभोवतालच्या व्यक्तींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यवसाय कामांना निश्चित दिशा मिळेल. आर्थिक स्थितीचा आलेख उंचावेल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चौफेर नजर ठेवावी लागेल. नोकरीत कामात झालेला विलंब तुम्हाला सहन होणार नाही. नवीन नोकरीत प्रयत्नात राहा. घरात मुलांच्या व इतर व्यक्तींच्या आवडनिवडीने वागाल. जिभेचे चोचले पुरवावे लागतील. तरुणांना विवाहाचे वेध लागतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात टंगळमंगळ करू नये.
सिंह : कमी कामात जास्त यश मिळेल. ग्रहांची अनुकूलता राहील. व्यवसायात विरोधकांवर मात करण्यात यशस्वी व्हाल. कामाचा तणाव कमी होईल. अनपेक्षित लाभाची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे कराल. कामानिमित्त जादा सवलती मिळतील. तुमचे महत्त्व सहकाऱ्यांना कळेल. घरात मतभेदात समेट होईल. पाहुण्यांची ये-जा राहील. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. गृहसौख्याचा आनंद उपभोगाल.
कन्या : कामांना गती मिळेल. तुमचा हुरुप वाटेल. व्यवसायात तांत्रिक अडचणींमुळे लांबलेली कामे गती घेतील. कामात बदल करून उलाढाल वाढवण्यात यशस्वी व्हाल. प्रगतीचा मोठा टप्पा गाठण्याची मनीषा राहील. नोकरीत केलेल्या कामाचा आनंद मिळेल. बेकारांना नवीन नोकरी मिळेल. जोडधंद्यातून फायदाही होईल. घरात शुभसमारंभ ठरतील. महत्त्वाचे निर्णय होतील. विद्यार्थ्यांनी प्रलोभनांपासून दूर राहावे.
तुळ : ग्रहमानाची साथ मिळेल. व्यवसायात प्रगतीचा आलेख चढता राहील. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. पैशाची चिंता मिटेल. परदेश व्यवहारासंबंधी निर्णय निश्चित ठरतील. नोकरीत तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होईल. वरिष्ठ व सहकारी नवीन कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवतील. घरात नवीन वस्तू खरेदीचा मोह होईल. पाहुण्यांची ये-जा राहील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
वृश्चिक : अडचणींवर यशस्वीपणे मात करून अपेक्षित यश मिळवाल. व्यवसायात नवीन कामांना चालना मिळेल. खेळत्या भांडवलाची सोय होईल. रेंगाळलेली कामे वेळेत पूर्ण होतील. काही महत्वाचे निर्णय घ्याल. एखादी अवघड वसुलीही होईल. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून मागण्या मांडा. मिळालेल्या संधीचा लाभ घ्या. घरात अनपेक्षित खर्च राहतील तरी रागावू नका. तब्येतीची काळजी घ्या. आप्तेष्टाच्या सहवासात वेळ मजेत जाईल.
धनु : योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा झाल्याने वेगाने कामाला लागाल. ध्येय धोरणे ठरवून मगच कृती करा. कामाच्या प्रमाणात फायद्याचे प्रमाणे असेल. चार पैसे हातात खेळतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवासयोग येतील. सुप्त कलागुणांना वाव मिळेल. घरात सहजीवनाचा आनंद मिळेल. खरेदीचे योग येतील. तरुणांचे पूर्वी ठरलेले विवाह पार पडतील. आनंदाची वार्ता कळेल.
मकर : द्विधा मनस्थिती होईल तरी सबुरीने वागा. माणसांची पारख योग्य प्रकारे करा. व्यवसायात जिद्द व चिकाटी यांचे जोरावर कठीण परिस्थितीतून यशस्वीपणे पार पडाल. महत्वाची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर राहील. सतर्क राहून सभोवतालच्या व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवा. नोकरीत कोणत्याही आमिषास बळी न पडता काम चोख करा. चित्त विचलित होऊ देऊ नका. घरात मनाप्रमाणे कामे व्हावी हा अट्ठाहास नको. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची कास सोडू नये.
कुंभ : मानसिक स्वास्थ्य लाभेल. त्याचा फायदा सर्व स्तरांवर होईल. व्यवसायात जी कामे विनाकारण लांबली होती ती हाती घेऊन मार्गी लावाल. आर्थिक स्थिती सुधारेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत मानले तर समाधान मिळेल. मागण्यांसाठी अडून राहू नका. घरात वादविवादांचे प्रसंग टाळा. घरात मतभेदात समेट होईल. माणसांची किंमत कळेल. आप्तेष्टांच्या भेटीगाठीचे योग येतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात टंगळमंगळ करू नये.
मीन : दिलासा देणारे ग्रहमान आहे. व्यवसायात दिसते तसे नसते हे लक्षात ठेवावे. अतिविश्वस टाळावा. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून निर्णय घ्यावेत. पैशाचे व्यवहारात चोख राहावे. नोकरीत मिळालेल्या अधिकारांचा वापर योग्य कारणासाठीच करावा. गैरसमजुतीने होणारे वाद टाळावेत. सहकारी व वरिष्ठांवर विसंबून राहू नये. घरात प्रयत्नांची उकल होईल. काही ठोस बेत निश्चित होतील. शुभकार्ये ठरतील. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पद्धतीने अभ्यास करावा