शतकवीर विराट कोहली ड्रेसिंग रूममधून पत्नीची झलक पाहत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की विराट कोहली ड्रेसिंग रूमच्या बाल्कनीतून वरच्या स्टँडकडे पाहत आहे, जिथे त्याची पत्नी अनुष्का शर्मा बसली आहे. त्याचवेळी अनुष्का शर्माला याबाबत कल्पनाही होती की विराट तिला पाहण्यासाठी धडपडतो आहे. मात्र, विराट कोहली पत्नी अनुष्काला पाहू शकला नाही.
virat looking for anushka from the stands 😭❤️ pic.twitter.com/KeHpW08ANp
— Saharsh (@whysaharsh) November 15, 2023
विराट कोहलीचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. या जोडीबद्दल चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.एका यूजरने लिहिले की,’लोकांनी त्यांना खूप ट्रोल केले, पण दोघेही वाईट काळात सोबत राहिले आणि आता यशाचा आनंद लुटत आहेत.’
एका युजरने कमेंट केली की,’हे जोडपे खूप क्यूट दिसत आहे.’आणखी एका युजरने लिहिले की,’त्याच्यासाठी नेहमीच पहिला अभिमानी ─पती असेल.’ एका यूजरने लिहिले की,’जर एखादा माणूस तुमच्यावर प्रेम करत असेल तर तो तुमच्यासाठी काहीही करेल. आयकॉनिक फुटेज.’एका यूजरने कमेंट केली की, ‘पुरुष प्रेमात काही औरच बनतात.’
विराट कोहली आणि अनुष्का शर्मासाठी बुधवारचा दिवस खूप चांगला होता. कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीतील 50 वे शतक पूर्ण केले. यादरम्यान, एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अनुष्का शर्माने तिच्या पतीला भरपूर फ्लाइंग किस दिले होते. शतक पूर्ण केल्यानंतर विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्माला फ्लाइंग किस दिला. या दोघांची केमेस्ट्री प्रेम चाहत्यांना खूप आवडते.