मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात, ज्यांना चाहत्यांनी पसंती दिली आहे आणि खूप प्रेमही केले आहे. अशातच अनुष्का शर्माने तिला न आवडणारे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असले तरी तिने तसे करण्यामागचे कारणही सांगितले आहे.
View this post on Instagram
एकीकडे अनुष्काच्या या फोटोवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर काही युजर्सकडून ट्रोलिंगही होत आहे. अनुष्काच्या फोटोंसोबतच तिची पोस्ट कॅप्शनही चर्चेत आहे. अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
शेअर केलेल्या या फोटोमध्ये अनुष्काने लिहिले की, ‘मला एकही फोटो आवडला नाही, म्हणून मी विचार केला की, मला नेहमीच चांगला फोटो टाकावा लागतो असे कोण म्हणाले? तर हे माझे ok ok टाईपचे फोटो आहेत जे मी टाकत नाही पण ते काढण्यासाठी माझा टाइम वापरला आहे, मग ते पोस्ट केले आहे.’
View this post on Instagram
अनुष्का शर्माच्या फोटोंवर सोशल मीडिया यूजर्स सोबतच बॉलीवूड सेलेब्सनेही या विचाराचे कौतुक केले तर काहींनी तिला ट्रोल केले. यातच अभिनेता अर्जुन कपूरची प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे. अर्जुनने अनुष्काच्या पोस्टवर कमेंटमध्ये लिहिले की, ‘हुडी चांगली आहे, फोटो खराब आहेत, मी सहमत आहे.’ अर्जुनच्या या कमेंटवर सुमारे दीड हजार लाईक्स आले असून भरपूर रिप्लाय आले आहेत. त्याचवेळी रणवीरने पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये हसणारा इमोजी कमेंट केला आहे.
View this post on Instagram