मागच्या वर्षी गायिका सोना मोहापात्राने “मीटू’ च्या मोहिमेतून संगीतकार अनु मलिक यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. अनु मलिक हे तेव्हापासून चर्चेत आहेत. आता सोनाने पुन्हा एकदा त्याच्यावर टीका केली असल्यामुळे त्याला पुन्हा एकदा “इंडियन आयडॉल’चे परीक्षक पद सोडावे लागले.
“इंडियन आयडॉल’च्या अकराव्या पर्वाचे परीक्षक म्हणून अनु मलिक काम करत होता. गायिका नेहा कक्कर आणि विशाल दादलानी हे देखील त्यांच्यासोबत परीक्षकाची भूमिका पार पाडत आहेत.
पण, मागच्या वर्षीपासून “मीटू’मध्ये अनु मलिकचे नाव अडकल्यामुळे त्याला मागच्या वर्षीदेखील या पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. त्याला यावेळी पुन्हा एकदा परीक्षकाची जबाबदारी देण्यात आली होती. पण, त्याच्यावर सोनाने पुन्हा टीका केल्यामुळे त्यांनी हे पद सोडले आहे.
अनु मलिकने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही दिवसांपर्वी एका पोस्टद्वारे आपल्यावरचे आरोप फेटाळले होते.
पण, अनु मलिकवर सोनासोबतच नेहा भसीन आणि श्वेता पंडित यांसारख्या गायिकांनीही आरोप केल्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगानेही याबाबतची दखल घेतली आहे.