मुंबई – बॉलीवूडच्या अनेक जोडप्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यात हृतिक रोशन आणि सुझान खान, अरबाज खान आणि मलायका अरोरा, अमीर खान आणि किरण राव यासारख्या जोडप्यांचा समावेश आहे. यातच आता अभिनेता फरदीन खान आणि पत्नी नताशा माधवानी हे कपल देखील लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.
मागील 18 वर्षांपासून एकत्र संसार करणाऱ्या या जोडप्याने अचानक विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. मात्र मागील काही काळापासूनच फरदीन आणि नताशा वेगळे राहत असल्याचे म्हंटले जात आहे. फरदीन आईसोबत मुंबईमध्ये तर नताशा लंडनमध्ये राहत असल्याचे म्हंटले जात आहे. या दोघांमध्ये सतत वाद होत असल्याने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप नताशा आणि फरदीन याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.
View this post on Instagram
दरम्यान, नताशा मुमताज यांची मुलगी आहे. तर फरदीन दिवंगत अभिनेते फिरोज खान यांचे पूत्र आहेत. 2005 साली नताशा माधवानी आणि फरदीन खान यांनी लग्न केले होते. दोघांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. तर, दुसरीकडे फरदीन ‘विस्फोट’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.