Mahua Moitra – तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या निलंबनावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. दरम्यान, मोईत्रा यांना आणखी एक धक्का बसला आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयाकडूनही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.
मोहुआ मोईत्रा यांना सरकारी घर खाली करण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानंतर मोईत्रा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली आहे.
मोहुआ मोईत्रा यांना ७ जानेवरीपर्यंत सरकारी घर खाली करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. ही नोटीस रद्द करण्यात यावी, अशी याचिका मोईत्रा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती.
उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले की, सरकारी घर तुमच्याकडे राहावे, यासाठी तुम्ही संबंधित यंत्रणेशी संपर्क करायला हवा. शिवाय, न्यायालयाने मोईत्रा यांचे घर खाली करण्यास परवानगी दिली आहे.
घर खाली करण्यासाठी नोटीस मिळाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मोईत्रा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाकडे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत वेळ मागितला होता. मात्र, न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळत सरकरला कारवाई करण्याची परवानगी दिली होती.