चीनला आणखी एक झटका ; आता ‘हा’ देश घालणार टिकटॉकवर बंदी?

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील तणावपूर्ण वातावरणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम होताना दिसत आहे. कारण चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा भारताने प्रयत्न करत चीनच्या ५९ ऍपच्या देशातील वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या ५९ ऍप मधील टिकटॉक हे तरुणांमधील सर्वाधिक वापरले जाणारे ऍप होते. दरम्यान, भारताच्या याच कृतीचे अनुकरण आता जगातील आणखी एक देश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टिकटॉकला बॅन करण्याचा विचार सरकारकडून करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.

मागील काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया आणि चीन यांच्यात तणावाचे वातावरण आहे. त्यातच देशात आता चिनी ऍप टिकटॉकच्या बंदीची मागणी जोर धरत आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत ऑस्ट्रेलियाच्या संसदीय समितीने हे मागणी केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि युझर्सचा डेटा चीनसोबत शेअर करण्याच्या मुद्द्यावरून टिकटॉकला बॅन करण्यात येऊ शकते असे म्हटले जात आहे.

ऑस्ट्रेलियातील टिकटॉक युझर्सचा डेटा चीनच्या सर्व्हरला सेंड करणे हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या एका खासदाराने म्हटले आहे. टिकटॉकच नाही तर चीनचे वि चॅट हे ऍप देखील देशासाठी धोकादायक असल्याचे आणखी एका खासदाराने म्हटले आहे. त्यामुळे भारतानंतर ऑस्ट्रेलियातही चीनच्या ऍपला धोका निर्माण झाला असल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.