World Cup 2023 IND vs ENG Match Update : लखनौच्या कठीण खेळपट्टीवर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघासाठी मोठा आधारस्तंभ म्हणून उभा राहिला. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात हिटमॅनने शानदार फलंदाजी केली आणि विश्वचषक 2023 मध्ये आणखी एक अर्धशतक झळकावले. रोहितने अर्धशतक करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. (IND vs ENG)
लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा हिटमॅन भारताचा पाचवा फलंदाज ठरला आहे. रोहितपूर्वी सौरव गांगुली, राहुल द्रविड, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांनी हा टप्पा गाठला आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर ३४,३५७ धावांसह अव्वल स्थानावर आहे. तर कोहली २५,८५२ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. (WorldCup 2023)
Milestone Unlocked 🔓
1⃣8⃣,0⃣0⃣0⃣ international runs & counting for #TeamIndia Captain Rohit Sharma 👏👏#CWC23 | #MenInBlue | #INDvENG pic.twitter.com/zV5pvstagT
— BCCI (@BCCI) October 29, 2023
हिटमॅनने अर्धशतक केले
रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध सुरुवातीपासूनच फॉर्ममध्ये दिसला आणि दमदार सुरुवात केली. मात्र, एका टोकाकडून लागोपाठ तीन विकेट पडल्यानंतर हिटमॅनने आपली खेळण्याची शैली बदलली आणि दडपणाखाली शानदार फलंदाजी केली आणि २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत आपले दुसरे अर्धशतक झळकावले.
भारताची खराब सुरुवात
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. शुभमन गिल 13 चेंडूंचा सामना केल्यानंतर केवळ 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ख्रिस वोक्सने गिलला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर कोहली डेव्हिड विलीचा बळी ठरला. श्रेयस अय्यरही फलंदाजीत विशेष काही दाखवू शकला नाही आणि 16 चेंडू खेळून केवळ 4 धावा करून बाद झाला.