Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे मागच्या पाच दिवसापासून (Manoj Jarange) उपोषणाला बसले आहेत. आरक्षणासाठी अंतरवाली सराटी याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण 25 ऑक्टोबरपासून सुरू आहे.
अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी चर्चेचं आवाहन केलं आहे. मनोज जरांगे यांनीही सरकारने चर्चेला यावं, असं प्रतिआवाहन केलं आहे.
पण अद्याप सरकारकडून चर्चेसाठी सकारात्मक हालचाली होत नसल्याने मनोज जरांगे यांनी पुन्हा सरकारला ललकारलं आहे. माझं हृदय बंद पडलं तर सरकारचं हृदय बंद पडलंच म्हणून समजा, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
मराठा आरक्षणासाठी विविध जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी आपापले राजीनामे पक्ष नेतृत्वाकडे दिले आहेत. काही आमदारांनी मराठा आरक्षणाला पाठींबा देत सरकारला धारेवर धरले आहे.
अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शिंदे गटाच्या (Shinde Group) खासदारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलाय.
हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी शिवसेनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात आपल्या कार्याची सुरवात केली. हिंगोली आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. हेमंत भाऊ या नावाने ते या दोन्ही जिल्ह्यात परिचित आहेत.