पिंपरी – शहरामध्ये गुरुवारी (दि. 14) नव्याने 146 जणांना करोनाची लागण झाली. बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये शहरातील 133 तर, शहराबाहेरील 13 रुग्णांचा समावेश आहे. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.
करोनामुळे 54 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. करोनामुक्त झालेल्या 117 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.पालिकेच्या रुग्णालयात सध्या शहरातील 639 व शहराबाहेरील 80 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर गृह विलगीकरणात 920 रुग्ण आहेत. 1 हजार 883 संशयितांचा अहवाल प्रलंबित आहे. शहरामध्ये आत्तापर्यंत एकूण 98 हजार 481 करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यातील 95 हजार 140 रुग्ण करोनामुक्त झाले.
जिल्हा रुग्णालयात 5 करोनाबाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात गुरुवारी 5 जणांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर, करोनामुक्त झालेल्या तीन महिलांना डिस्चार्ज देण्यात आला. करोनाबाधित रुग्ण हे दापोडी, कैलासनगर, शिरूर तालुक्यातील आहेत. त्यामध्ये 4 पुरुष आणि एका महिला रुग्णाचा समावेश आहे. करोनामुक्त झालेल्या महिला मारुंजी, नवी सांगवी आणि औंध येथील रहिवाशी आहेत. रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 696 जण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर, 675 जणांना होम क्वारंटाइन केले आहे.