स्वदेशी “अस्मि’ करणार सैनिकांचे रक्षण

पुणे  : सशस्त्र दलातील कमांडर्स त्याचबरोबर रणगाडे आणि विमानात तैनात असलेल्या क्रू मेंबर्ससाठी वैयक्तिक शस्त्र म्हणून उपयुक्त ठरेल अशा स्वदेशी बनावटीच्या “अस्मि’ ( ASMI ) ही पिस्तूल विकसित करण्यात शास्रज्ञांना यश आले आहे. लवकरच हे शस्र लष्कर आणि निमलष्करी दल यांच्या सेवेत दाखल होईल, अशी अपेक्षा लष्कर प्रशासनाने व्यक्त केली. ( DRDO develops India’s first indigenous machine pistol ASMI )

संरक्षण संशिधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे देशाची पहिली स्वदेश निर्मित 9 एमएम मशीन पिस्तूल विकसित केले आहे. लष्कराची मध्यप्रदेशातील महू येथील इन्फंट्री स्कूल आणि डीआरडीओच्या पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था(एआरडीई) यांनी हे पिस्तूल विकसित केले आहे. चार महिन्यांच्या विक्रमी वेळेत हे शस्त्र विकसित करण्यात आहे. मेटल थ्रीडी प्रिंटिंगच्या सहाय्याने बनविलेल्या ट्रिगर घटकांसह विविध भागांच्या डिझाइनिंग आणि नमुन्यामध्ये थ्रीडी प्रिंटिंग प्रक्रिया वापरली आहे.

सशस्त्र दलातील सैनिकांसाठी वैयक्तिक शस्त्रे म्हणून तसेच केंद्रीय आणि राज्य पोलिस संघटना तसेच व्हीआयपी संरक्षण आणि गस्त यामध्ये या पिस्तुलाचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्‍यता आहे. मशीन पिस्तूलाची उत्पादन किंमत प्रत्येकी 50,000 रुपयांपेक्षा कमी असून याची निर्यात होण्याची देखील शक्‍यता आहे.

पिस्तूलाचे नाव “अस्मि’ असे ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ गर्व, स्वाभिमान आणि कठोर परिश्रम होय. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनाला अनुसरून स्वालंबनाच्या दिशेने टाकलेले हे एक छोटे पाऊल आहे आणि सेवा आणि निमलष्करी दल (पीएमएफ) यामध्ये लवकरच याचा समावेश होईल अशी अपेक्षा लष्कर प्रशासनाने व्यक्त केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.