- दिवसभरात दोघांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस घटत असले तरी गेल्या 24 तासांत पुन्हा 135 नव्या रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 88 हजार 422 इतका झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 2 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
बुधवारी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (गुरुवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 131 जणांना करोनाची लागण झाली असून शहराबाहेरील 4 जणांचा करोना अहवाला सकारात्मक आला आहे. तर गेल्या 24 तासांत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण शहरातील रहिवाशी होते. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 1538 वर पोहोचला असून शहराबाहेरील 637 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 2175 ची संख्या आज गाठली.
गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये चिंचवड येथील एका 73 वर्षीय महिलेचा समावेश असून शहराबाहेरील जुन्नर येथील एका 70 वर्षीय इसमाचा समावेश आहे. आतापर्यंत शहरातील 85 हजार 74 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 6482 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 124 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 616 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयीत असलेले 1969 जण महापालिकेच्या विविध रुग्णांलयांमध्ये दाखल झाले आहेत.
हिंजवडीतील एकाचा करोनाने मृत्यू
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 53 वर्षीय पुरुषाचा गुरुवारी (दि. 5) करोनामुळे मृत्यू झाला. रुग्णालयात आज चार करोनाबाधित रुग्णांची भर पडली.
लोहगाव, सुसगाव, पाषाण, खडकी येथून उपचारासाठी दाखल 4 रुग्णांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये 3 पुरुष आणि एक महिला रुग्णाचा समावेश आहे. करोनामुक्त झालेल्या तिघांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उरळी कांचन आणि लोणी काळभोर येथील ते रहिवाशी आहेत. 2 पुरुष आणि एक महिला रुग्णाचा त्यामध्ये समावेश आहे. रुग्णालयात सध्या 16 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. करोनामुक्त झालेल्या एकूण 546 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर, 147 जणांचा मृत्यू झाला आहे.