अभिनेता अन्नू कपूरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी येत आहे. अन्नू कपूर यांना छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत, असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अन्नू कपूरचे मॅनेजर सचिन यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, त्यांच्या छातीत जळजळ होत होती. यानंतर त्यांना निरीक्षणावर ठेवण्यात आले होते. सकाळीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. अन्नू कपूरने जेवण केले आहे आणि ते सर्वांशी आरामात बोलत आहे.
डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
प्रसिद्ध अभिनेता आणि गायक अन्नू कपूर यांना २६ जानेवारीला सकाळी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. अजय (व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष) यांच्या मते, कपूर यांना छातीत त्रास झाल्यामुळे दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर कार्डिओलॉजी डॉक्टर सुशांत उपचार घेत आहेत. यावेळी अन्नू कपूरची प्रकृती स्थिर आहे.
अन्नू कपूरचा जन्म 20 फेब्रुवारी 1956 रोजी भोपाळमध्ये झाला. अन्नू कपूरचे वडील मदनलाल कपूर पंजाबी होते. त्यांची आई कमला बंगाली होती. अन्नू कपूरचे वडील एक पारशी थिएटर कंपनी चालवत असत, ही शहरा-शहरात जाऊन गल्लीबोळात नाटक करत असे. तर, त्यांची आई कवयित्री होती. तसेच त्याला शास्त्रीय नृत्याची आवड होती. कुटुंब खूप गरीब होते. अन्नू कपूर आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेऊ शकले नाहीत. अशात अन्नू कपूर लहानपणीच वडिलांच्या थिएटर कंपनीत रुजू झाले. त्यानंतर अन्नू कपूरने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. इथे खूप मेहनत घेतली. थिएटर केले. अभिनय शिकले.