नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातल्या योगी सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उत्तर प्रदेशातल्या खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या दोन मुलींपैकी एका मुलीची आता योगी सरकार भरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘जर दोन सख्ख्या बहिणी खासगी शाळेत शिकत असतील, तर यूपी सरकार त्यांच्यापैकी एकाची फीस भरेल. त्यासाठी पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येत आहे’. असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता या निर्णयाचा फायदा प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या लाखो विद्यार्थिनींना होणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी योगी म्हटले होते की, ‘जर दोन बहिणी खासगी शाळेत शिकत असतील तर त्या शाळेच्या व्यवस्थापनाला एका मुलीची फी माफ करण्याची विनंती करावी. शालेय व्यवस्थापनाच्या पातळीवरून हे शक्य नसेल, तर मुलीची फी राज्य सरकार भरेल’. असं ते म्हणाले होते. आणि त्यामुळेच आता योगी सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.