मुंबई – भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
तर दुसरीकडे अभिनेत्री अंकिता लोखंडेला मात्र याहे काहीही गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे. एकीकडे लता मंगेशकर यांच्या निधनाने सर्वजण दु: खात असताना, दुसरीकडे मात्र अंकिता लोखंडे ही आनंद व्यक्त करताना पाहायला मिळाली. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकाऱ्यानी अंकिताला चांगलेच सुनावले आहे.
View this post on Instagram
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अंकिता तिच्या पती विकी जैनसोबत कारमध्ये “बिजली बिजली..’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर तासाभरात तिने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून नेटकरी अंकिता लोखंडेवर भडकले आहे.
“अरे काही तर लाज बाळग, हे सर्व उद्याही करू शकतेस…’, ‘मूर्ख मुली, लताजी सुद्धा इंदूरच्या आहेत आणि तू पण. काही तर लाज ठेव..’ या आशयाच्या प्रतिकिया नेटकाऱ्यानी केल्या आहे. लता दीदींच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अक्षय कुमारपासून ते भूमी पेडणेकर, निमृत कौर, विशाल ददलानी, दिया मिर्झा आणि हंसल मेहतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी लताजींना श्रद्धांजली वाहिली आहे.