अभिनेता रणबीर कपूर ‘तू झुठी मैं मक्कर’ नंतर संदीप रेड्डी वंगा यांच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसणार आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. आता चित्रपट निर्मात्यांनी या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा प्री टीझर रिलीज केला आहे. चित्रपटाचा प्री-टीझर पाहता रणबीर ‘अॅनिमल’मध्ये दमदार अॅक्शन करताना दिसत आहे.
‘अॅनिमल’चा ट्रेलर रिलीज होण्याआधीच त्याचा प्री-टीझर रिलीज झाला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. प्री-टीझरच्या सुरुवातीला, काही लोक दाखवले आहेत ज्यांनी विशेष मुखवटे घातले आहेत आणि त्यांच्या हातात कुऱ्हाड आहे. यानंतर, चित्रपटाच्या मुख्य भूमिकेची एंट्री होते जो हातोडा उचलतो आणि प्रत्येकाला जणू सैतान पछाडल्यासारखे कापायला लागतो. प्री-टीझरच्या शेवटी या सैतानाचा अर्धा चेहरा दाखवण्यात आला आहे, जो दुसरा कोणी नसून रणबीर कपूर आहे. संपूर्ण प्री-टीझरच्या पार्श्वभूमीवर एक पंजाबी गाणे वाजत आहे.
दरम्यान, संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित, भूषण कुमार निर्मित ‘अॅनिमल’ हा चित्रपट एक उत्कृष्ट कथा आहे. ज्यामध्ये रणबीर कपूरसोबत अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी सारखे स्टार कलाकार देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या 5 भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.