Animal : संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित आणि रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ ( Animal ) चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता पर्यंत ‘ॲनिमल’ चित्रपटाने ( Animal ) तब्बल २०० कोटींचा टप्पा ओलांडला असून शनिवार, रविवार सुट्ट्यांचा चित्रपटाला मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
यावर्षातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा ओपनिंग चित्रपट बनला आहे. या चित्रपटाची क्रेझ बॉक्स ऑफिसच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये देखील दिसली होती. ‘ॲनिमल’ शुक्रवारी १ डिसेंबर रोजी रिलीज झाला असून, सिनेरसिकांची मोठी पसंती चित्रपटाला मिळाली आहे.
त्यामुळे बॉक्स ऑफिसवर तर हा चित्रपट आणखी धुमाकूळ घालणार आहेच, पण अशातच आता लोकांना या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजचे वेध लागले आहेत. नुकतंच या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजशी निगडीत काही माहिती समोर आली आहे.
#Animal Streaming Partner NETFLIX.
— Christopher Kanagaraj (@Chrissuccess) December 1, 2023
हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ( Ott Platform ) प्रदर्शित होणार आहे ते स्पष्ट झालं आहे. रणबीर कपूरच्या या ‘अॅनिमल’चे स्ट्रीमिंगचे हक्क किंवा डिजिटल हक्क हे ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे ( Ott Platform ) असल्याने हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार हे नक्की झालं आहे.
या संदर्भातील एक ट्विट देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. ‘अॅनिमल’मध्ये रणबीरसह रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ती डीमरी हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.