पिंपरी – शेतात जनावराचे रक्त आणि विष्ठा आढळून आली. ही घटना भोसरी येथे शनिवारी (दि. 26) सकाळी उघडकीस आली. श्रीकांत मदन गव्हाणे (वय 32, रा. दिघीरोड, भोसरी) यांनी सोमवारी (दि. 28) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान फिर्यादी यांच्या शेतात कोणीतरी जनावराच रक्त आणि विष्ठा आणून टाकली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. हे रक्त नेमक्या कोणत्या जनावराच आहे, याबाबतची माहिती घेण्यासाठी रक्ताचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे.