मुंबई – परकीय चलन नियंत्रण कायद्याचा भंग केल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या एका प्रकरणानुसार ईडीने आज उद्योगपती अनिल अंबानी यांची चौकशी केली. 64 वर्षीय अनिल अंबानी हे आज मुंबईतल्या बॅलॉर्ड इस्टेट भागातल्या ईडीच्या कार्यालयात पोहचले. व तेथे त्यांनी आपला जबाब दिला.
सन 2020 मध्येही एका मनि लॉंड्रिंग प्रकरणात ईडीने अनिल अंबानी यांना चौकशीसाठी बोलावले होते. येस बॅंकेचे प्रमोटर राणा कपुर यांच्या गैरव्यवहाराशी संबंधीत होते. अनिल अंबानी यांनी येस बॅंकेकडून 12 हजार 800 कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते पण त्यांनी हे कर्ज बुडवले आहे.
आज ज्या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात आली आहे त्यात त्यांच्या विदेशातील काहीं व्यवहारांचा समावेश आहे. त्यांच्या या व्यवहारात फेमा म्हणजेच परकीय चलन कायद्याचा भंग केल्याचा आरोप आहे. आजच्या चौकशीत अनिल अंबानी यांनी नेमका काय तपशील सादर केला याची माहिती लगेच मिळू शकलेली नाही.