अनिल अंबानी आता श्रीमंत राहिलेले नाहीत!

ब्रिटनमधील न्यायालयात वकिलाचा युक्तिवाद

लंडन -भारतातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक असणारे अनिल अंबानी यांचा समावेश साहजिकच श्रीमंत व्यक्तींमध्ये होतो. मात्र, आता ते श्रीमंत राहिलेले नाहीत, असे म्हटल्यास सगळेच चक्रावून जातील. मात्र, तसा युक्तिवाद अंबानी यांच्या वकिलांनी ब्रिटनमधील न्यायालयात केला आहे.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) कंपनीला चीनच्या तीन बॅंकांनी दिलेले सुमारे पावणे पाच हजार कोटी रूपयांचे कर्ज थकले आहे. ते कर्ज वसूल करण्याचे प्रकरण ब्रिटनमधील न्यायालयात पोहचले आहे. त्या न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी अंबानी यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.

भारत सरकारने स्पेक्‍ट्रम वाटपाबाबतचे धोरण बदलले. त्याचा प्रतिकूल परिणाम मोठ्या प्रमाणात भारतीय दूरसंचार क्षेत्रावर झाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here