बॉलीवूडमध्ये अनिल कपूर असता अभिनेता आहे, जो वाढत्या वयानुसार अजूनही चिरतरुण होत असल्याचे म्हटले जाते. हा चिरतरुणपणा आणि तंदुरुस्ती टिकवण्यासाठी तो खूप मेहनत घेतो. अलीकडेच त्याने त्या लग्नाचा 36वी ऐनिव्हर्सरी साजरी केली. या दिवशी त्याने एक गंभीर चूक केली, ज्यामुळे त्याला प्रायश्चित देखील करावे लागले आहे.
अनिल कपूरने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने एक मजेदार कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले आहे की, हा गुन्हा करायला मला खूप मजा आली – ऐनिव्हर्सरीचा संपूर्ण केक फस्त केला. आता मला सर्व कॅलरी बर्न कराव्या लागतील.
लॉकडाऊनदरम्यान अनिल कपूर आणि त्याची पत्नी सुनीता यांनी त्यांची ऐनिव्हर्सरी साजरी केली. या दिनी सोनम कपूरने दोघांचे फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देऊन सोनमने असे लिहिले की, तुम्ही 3 कॉन्फिडेंट आणि क्रेझी मुलांना जन्म दिला आहे. आम्हाला आशा आहे की, आम्ही तुम्हाला प्राउड फील करून देवू.