आलिया भट बऱ्याच दिवसांपासून लग्न आणि आगामी सिनेमांबाबतच्या चर्चेत राहिली आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत आलियाकडून विशेष काहीच टिप्पणी झालेली नाही. पण एका कार्यक्रमात अशाच एका संवेदनशील प्रसंगात आलिया अगदी भावुक झाली आणि तिला अश्रु अनावर झाले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि आलियाच्या अश्रुंची चर्चा व्हायला लागली.
मुंबईत आयोजित एका सेमिनारमध्ये आलिया आणि तिची मोठी बहिण शाहिन सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी शाहिनच्या डिप्रेशनबाबत आलिया बोलत होती. अचानक आलियाचे डोळे पाण्याने डबडबले आणि ती हुंदके देऊन रडायला लागली. शाहिन तिच्या जवळ आली आणि तिने आलियाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
पण तिलाही अश्रु अनावर झाले होते. शाहिन आलियापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे आणि गेल्या 13 वर्षांपासून ती डिप्रेशनमध्ये आहे. तिने स्वतःच्या डिप्रेशनबाबत “आय हॅव नेव्हर बीन अनहॅपीअर’ हे एक पुस्तक देखील लिहीले आहे.
हे पुस्तक वाचल्यावरच आपल्याला शाहिनचे दुःख समजले असे आलिया सांगत होती. काही दिवसूांर्वी आलियाने शाहिनच्या वाढदिवशी अत्यंत संवेदनशील नोट इन्स्टाग्रामवर लिहीली होती. आपल्या बहिणीबाबत आपण किती संवेदनशील आहोत, हेच आलियाने या पोस्टमधून सांगितले होते.