जोया अख्तर आता बऱ्यापैकी प्रसिद्ध नाव. जावेद अख्तर यांची मुलगी आणि फरहान अख्तरची बहीण ही ओळख तिने आता मागे टाकली आहे. तिच्या स्वत:च्या नावाने आता तिला ओळखले जाते, तिच्या चित्रपटांची दखलही घेतली जाते. तिचा या अगोदरचा गली बॉय चांगलाच लक्षवेधी ठरला होता व अजूनही त्याची तरुणाईत चर्चा असते.
View this post on Instagram
आता जोया नवा चित्रपट करते आहे. करोनाचा सध्याचा भर ओसरल्यावर त्याचे शूट सुरू होण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे नाव अद्याप घोषित केले नसले तरी प्रमुख कलाकारांच्या नावाची मात्र घोषणा करण्यात आली आहे. अगोदर फक्त अनन्या पांडेचे नाव जाहीर करण्यात आले होते.
View this post on Instagram
त्यात आता आणखी दोन नावांची भर पडली आहे. सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव ही अन्य दोन नावे. यातील सिद्धांतने अगोदर जोयासोबत गली बॉयमध्ये काम केले होते. अन्य दोघे मात्र पहिल्यांदाच आणि हे तिघेही पहिल्यांदाच परस्परांसोबत काम करत आहेत.
सिद्धांतची गली बॉय नंतर चांगली चर्चा झाली आहे. तर आकाशही व्हाइट टायगर या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आला आहे.
View this post on Instagram
बॉलीवूडमध्ये रोज ताज्या दमाचे कलाकार दाखल होत आहेत. त्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची फारशी संधी मिळत नाही. मात्र, जेव्हा मिळते तेव्हा त्याने मौके पे चौका मारावा लागतो. सिद्धांत आणि आकाशने तसे केलेले दिसतेय त्यामुळेच ते दुर्लक्षित झालेले नाही.
View this post on Instagram
दरम्यान, सिद्धांत आणि अनन्या करण जोहरच्या आगामी चित्रपटातही एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात दीपिका पादुकोणचीही प्रमुख भूमिका असणार आहे.