Anandraj Ambedkar । अमरावती लोकसभा मतदारसंघातून महत्वाची बातमी समोर येतीय. या मतदारसंघातून रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. उमेदवारी अर्ज दाखल करताना आनंदराज आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी आपल्याला पाठिंबा देणार, असा विश्वास व्यक्त केला होता. पण असं काही झालं नाही. वंचित बहुजन आघाडीनं आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा जाहीर केला नाही. त्यामुळे आनंदराज आंबेडकरांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
वंचितनं पाठिंबा न दिल्यानं माघार Anandraj Ambedkar ।
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी यासंदर्भात एक पत्रक जारी केलय. याच पत्रकातून त्यांनी वंचितला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी 2 एप्रिलला अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. वंचित बहुजन आघाडीकडे पाठिंब्यासाठी मागणी केली होती, परंतु वंचितनं पाठिंबा न दिल्यानं आनंदराज आंबेडकर यांनी माघार घेतली. मात्र, तरीही भाजप निवडून येऊ नये, यासाठी वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची माहिती आनंदराज आंबेडकर यांनी एका पत्रातून दिली आहे. आज अमरावतीत वंचितचा उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
भाजपला फायदा होऊ नये म्हणून, वंचितला पाठिंबा Anandraj Ambedkar ।
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आज अमरावती लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार होते. विशेष म्हणजे, वंचित बहुजन आघाडी अमरावतीत आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. सध्या असा काही निर्णय झालेला नाही. मुंबईत पक्षात यावर चर्चा होईल. निर्णय झाल्यानंतर आपल्याला कळवणार अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.