मुंबई – मुंबई क्राईम ब्रांचने सोमवारी उमेश कामत नामक एका आरोपीला अटक केली. तो पॉर्न प्रकरणात गुंतलेल्या एका कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक असून ही कंपनी एका बड्या अभिनेत्रीची असल्याची चर्चा आहे.
याच प्रकरणात गेल्या आठवड्यात अभिनेत्री गहना वसिष्ठसह सहा जणांना अटक केली होती. पॉर्न सिनेमाचे शूटिंग मुंबईतच होत होते. मात्र व्हिडिओ अपलोड करण्यासाठी परदेशी आयपी ऍड्रेस आणि सर्व्हरचा वापर केला जात होता. कारवाईपासून वाचण्यासाठी ही शक्कल लढवली जात होती. त्यानंतर हे व्हिडिओ उमेशला मेल केले जात असत आणि नंतर उमेश हे व्हिडिओ लंडनमध्ये फॉरवर्ड करत असे.
त्यानंतर विविध OTT ऍप्सवर अपलोड केले जायचे असे अटक आरोपींच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेशचे मूळ काम को ऑर्डिनेट करणे होते. त्याच्या माध्यमातून पेमेंटही मिळत होते. क्राईम ब्रांचला कमीत कमी तीन डझन असे पॉर्न सिनेमांचे पुरावे मिळाले आहेत जे उमेशच्या मेलवर लंडनला पाठवण्यात आले होते आणि तेथून अपलोड झाले. उमेशला या कंपनीत भरभक्कम पगार होता. त्याची आता कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
या प्रकरणी अटक करण्यात आलेली मॉडेल गहना वसिष्ठ हिचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस आहे. याच ठिकाणी या सिनेमांचे शूटिंग चालत असे. दरम्यान, गहना निर्दोष असल्याचा दावा तिच्या वकीलांकडून करण्यात आला आहे.