इस्लामाबाद – सध्या लंडनमध्ये असलेले पाकिस्तानचे माजी पंतपधान नवाज शरीफ यांच्यावर पाकिस्तान सरकारने अटक वॉरंट जारी केले आहे.
लाहोर हायकोर्टाच्या अनुमतीने ते लंडनमध्ये चार आठवड्यांच्या उपचाराठी गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये आले होते. पण अजून ते पाकिस्तानात परतलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरुद्धच्या भ्रष्टाचार प्रकरणातील खटल्यांसाठी त्यांच्यावर हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
शरीफ यांना या आधी दोन प्रकरणांमथ्ये कारावासाची शिक्षा झाली आहे. त्यांच्यावर अन्यही खटल्यांची सध्या सुनावणी सुरू आहे.
ते वारंवार अनुपस्थित राहिल्याने इस्लामाबाद हायकोर्टाने त्यांना 22 सप्टेंबर रोजी कोर्टाच्या पुढे हजर राहण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार सरकारने त्यांच्यावर हे वॉरंट जारी केले आहे.