जयपूर – भारतीय हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान गुरुवारी रात्री राजस्थानमधील बारमेर येथे कोसळले. या अपघातात भारतीय हवाई दलाच्या दोन वैमानिकाचा मृत्यू झाला आहे.
Rajasthan | A MiG-21 fighter aircraft of the Indian Air Force crashed near Barmer district. Further details awaited pic.twitter.com/egJweDNL4a
— ANI (@ANI) July 28, 2022
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानमधील बडमेर जिल्ह्यात भारतीय हवाई दलातील मीग- २१ लढाऊ विमान कोसळले. या विमानात दोन वैमानिक होते. हा अपघात एवढा भीषण होता की कोसळल्यानंतर विमानाने जागेवरच पेट घेतला. अपघातानंतर विमानाचे भाग अक्षरश: विखुरले होते. या घटनेची माहिती होताच येथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले.
#WATCH | Rajasthan: A MiG-21 fighter aircraft of the Indian Air Force crashed near Barmer district. Further details regarding the pilots awaited pic.twitter.com/5KfO24hZB6
— ANI (@ANI) July 28, 2022
दरम्यान, या अपघातानंतर मिग-21 पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या काही वर्षांत अनेक अपघातांमध्ये अनेक मिग-21 विमाने गमावली आहेत. सध्या हवाई दलाकडे मिग-21 बायसनचे सुमारे सहा स्क्वॉड्रन असून एका स्क्वाड्रनमध्ये सुमारे 18 विमाने आहेत.
#Rajasthan | A MiG-21 fighter aircraft of the Indian Air Force crashed near Barmer district#IndianAirForce #NarendraModi pic.twitter.com/FXQIyDBedA
— Arvind kumar yadav (@arvindky1212) July 29, 2022
बालाकोट हवाई हल्ल्यानंतर, जेव्हा पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले, तेव्हा मिग-21 बायसनने त्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. याशिवाय, अनेक प्रसंगी मिग-21 ने आपल्या कारनाम्यांची छाप पाडली आहे. मिग Mi-21 बायसन विमान भारतीय हवाई दलाने 1960 मध्ये सुरू केले होते.