मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या गाण्यामुळे आणि परखड मतांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्या खूप सक्रिय असतात. विविध फोटो त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. अनेकदा त्यांना त्यांच्या फोटो आणि गाण्यावरून ट्रोल केले जाते. नुकतेच त्यांनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. सध्या त्यांनी शेअर केलेले फोटो चांगलेच व्हायरल होत आहे. लंडन येथील इंडियन ग्लोबल फोरमला भेट देत एका पॅनल डिस्कशनमध्ये अमृता फडणवीस या सहभागी झाल्या होत्या. तेथील हे फोटो आहेत.
अमृता फडणवीस यांनी फोटो शेअर करत “सर्वात धोकादायक, विषारी आणि क्रूर प्राणी हा फक्त माणूस आहे,” असं लिहिलं आहे. याबरोबर त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये त्यांनी हातावर घोरपड घेतलेली दिसतं आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांनी दोन्ही हातात साप पकडले आहेत. यावरून त्यांना पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
यावरून एका नेटकऱ्याने लिहिले की, “सध्या एक माणूस महाराष्ट्रात विषय पसरवतोय, ते किती जहाल आहे ते दिसतंयच. एक दिवस ते विषय त्यालाच डसेल.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं की, “मी काय म्हणतो, संजय राऊत यांच्याकडे आपलाच साप गेला होता का?” तसेच तिसऱ्याने लिहिले की, “घरात एक साप असताना दुसऱ्या सापाची काय गरज?” सध्या अमृता फडणवीस यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
यापूर्वी अमृता फडणवीस यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडांभोवती उभे असलेले काही फोटो शेअर केले होते. “काही लोक मानवनिर्मित जगात हरवून जातात तर काही निसर्गाच्या जंगलात स्वतःला शोधण्यासाठी भटकतात! पर्यावरणावर प्रेम करा, स्वतःला शोधण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी पर्यावरणााचे संरक्षण करा!”, असे आवाहन त्यांनी याद्वारे केले होते. मात्र त्यांच्या या फोटोशूटवरूनही त्यांना ट्रोल करण्यात आले होते.