सोनई – घोडेगावात अवैध धंद्यांना सुगीचे दिवस आले आहेत. गावठी दारू बरोबरच देशी विदेशी दारुचा महापुरुच आला आहे. त्याबरोबरच मटक्याच्या धंद्याची लाखों रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती मिळत आहे.
घोडेगावीतील जनावाराचा बाजार राज्याबरोबर परराज्यातही प्रसिद्ध आहे .तसेच येथील कांदा मार्केट मुळे येथे मोठ्या प्रमाणात अर्थिक उलाढाल होत असल्याने मटका व्यवसायांसाठी हे ठिकाण महत्वाचे केंद्र म्हणुन या कडे पाहिले जाते. जनावरांचा बाजार व कांदा मार्केट मुळें या ठिकाणी व्यापाऱ्यांची येथे जा असते. त्यामुळे येथे मटका व्यवसाय लाखोचा धंदा होत असतो.नगर संभाजीनगर हा महामार्ग घोडेगाव मधुनच गेल्यामुळे ही दोन महत्वाची शहरे जवळच असल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणात असुन जनावरा प्रमाणे प्रवाशी भरले जात आहे.
जवळच पांढरी पुल एमआयडिसी देखील असल्याने येथे अर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे सर्वंच बाबतीत सफलता असल्याने हे धंदे वाढीस लागले आहेत. कायमच पैसा हातात असल्याने आपसोक दारू मटका जुगार या कडे सर्व सामान्य माणुस आकर्षित होताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे याला पायबंद घालण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते मात्र मुग गिळवून गप्प आहेत .यातुन गुन्हेगारी वाढीस खतपाणी मिळत आहे. जुगार अड्ड्यावर हजोरो रुपये खेळले जातात अगदी कमी श्रमात हातात पैसा आल्याने तरुण पिढी याकडे वळून बरबाद होत असुन व्यसनाच्या आहारी जाऊन गुन्हेगारी क्षेत्रा कडे वाटचाल करत आहे. याची वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी गंभीर पणे दखल घेण्याची गरज आहे अन्यथा कालांतराने वेगळे चित्र पाहावयास मिळेल.