नवी दिल्ली – देशात करोना महासाथीची दुसरी लाट थैमान घालत असतानाच काळी बुरशीचे (म्युकरमायकोसिस / ब्लॅक फंगस) रुग्ण वाढू लागल्याने चिंतेत भर पडली आहे. करोनाच्या गंभीर संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांना काळ्या बुरशीची बाधा होत असल्याचं अनेक राज्यांमध्ये आढळून आलंय.
या आजारावर वेळीच उपचार न घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसून येत असून अनेक जणांना यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, काळ्या बुरशीवरील उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एका महत्वपूर्ण इंजेक्शनचे १९४२० डोस राज्यांना देण्यात आले आहेत.
याबाबत केंद्रीय खते आणि रसायन मंत्री सदानंद गौडा यांनी माहिती दिली आहे. अॅम्फोटेरिसिन बी ( Amphotericin B ) असे या इंजेक्शनचे नाव असून त्याच्या १९४२० मात्रा आज राज्यांना वितरित करण्यात आल्या आहेत. कोणत्या राज्याला इंजेक्शनच्या किती मात्रा देण्यात आल्या आहेत याची यादीच मंत्री गौडा यांनी ट्विट केली आहे.
यादीमध्ये गुजरातला सर्वाधिक ४६४० इंजेक्शन्स देण्यात आले आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्र ४०६०, तामिळनाडू १८४०, मध्यप्रदेश १४७०, उत्तर प्रदेश १२६० तर कर्नाटकाच्या वाट्याला १०३० लसी आल्या आहेत.
अॅम्फोटेरिसिन बी ( Amphotericin B ) इंजेक्शनची वाटप करण्यात आलेली राज्य खालील तक्त्याप्रमाणे
We’ve distributed 19,420 vials of Liposomal Amphotericin B injections to states for the treatment of #BlackFungus. Karnataka has been provided with 1030 vials. Domestic production is also increasing along with imports: Union Minister for Chemicals & Fertilizers, Sadananda Gowda pic.twitter.com/jX4q3rcfxH
— ANI (@ANI) May 24, 2021