नवी दिल्ली – बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासाठी यंदाची दिवाळी खूप खास होती. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते. अमिताभ बच्चन यांनी एक फॅमिली फोटो शेअर केला असून त्या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र दिसत आहेत. या फोटोवर नेटकऱ्यांनी बरीच चर्चा केली आहे. परंतु फोटोतील एक विचित्र पेंटिंग त्याहूनही अधिक चर्चेत होते.
– व्हायरल होतोय हा फोटो
वास्तविक, अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोच्या पाठीमागील भिंतीवर एक मोठे पेंटिंग दिसते. पेंटिंगमध्ये एक विशाल बैल दिसत आहे, ज्याचे पुढचे पाय थेट त्याच्या शेपटीला जोडलेले आहेत. हे पेंटिंग पाहताना खूप विचित्र दिसले. प्रत्येक चाहत्याचे लक्ष या विचित्र पेंटिंगने वेधून घेतले.
View this post on Instagram
4 कोटींची पेंटिंग
अमिताभ बच्चन यांच्या ड्रॉईंग रूममधील या पेंटिंगची किंमत 4 कोटी रुपये आहे. हे चित्र मनजीत बावा (1941-2008) नावाच्या कलाकाराने बनवले होते.
View this post on Instagram
कोण आहेत कलाकार मनजीत बावा?
मनजीत यांचा जन्म पंजाबमधील धुरी येथे झाला. ते भारतीय पौराणिक कथा आणि सुफी तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन चित्रे काढत असत. प्राणी, निसर्ग, बासरीचे, माणूस आणि प्राणी एकत्र राहण्याच्या कल्पनेवर त्यांनी चित्रे तयार केली आहेत. मनजीत यांनी माँ काली आणि भगवान शिव यांची जास्त चित्रे काढली आहेत.